Ad will apear here
Next
रांका ज्वेलर्सचे बारावे दालन कोंढवा येथे सुरू
रांका ज्वेलर्सच्या कोंढवा येथील बाराव्या सुवर्ण दालनाच्या उद्घाटनप्रसंगी (डावीकडून) रांका परिवारातील श्लोक, मानव, वस्तूपाल,अनिल, फत्तेचंदजी, ओमप्रकाशजी, डॉ. रमेश, तेजपाल, श्रेयस आणि ऋषभ.

पुणे : १४० वर्षाची परंपरा असलेल्या सुप्रसिद्ध रांका ज्वेलर्सच्या बाराव्या सुवर्ण दालनाचा नुकताच कोंढवा येथे शुभारंभ झाला. पाच हजार चौरस फुटांच्या या प्रशस्त सुवर्णदालनाचे उद्घाटन रांका परिवारातील आजीपासून ते नातीपर्यंतच्या महिला, मुली  या सर्वांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रांका परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक, राजकीय तसेच अन्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 

जगातील सर्वात मोठ्या स्वारोस्की स्टडेड लेसर बांगड्या हे या दालनाचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. तब्बल १२ इंच म्हणजे एक फूट आकाराच्या सहा इंच व्यासाच्या या भल्या मोठ्या बांगड्यांची जोडी २२ कॅरेट सोन्यामध्ये घडविण्यात आली असून, त्यांचे वजन २२०२ ग्रॅम आहे. या बांगड्या घडविण्यासाठी तब्बल ७५ दिवस लागले असून, याची किंमत सुमारे ७७ लाख रूपये इतकी आहे. या जगावेगळ्या बांगड्या पाहण्यासाठी ग्राहक आवर्जून या दालनाला भेट देत आहेत.

या नवीन दालनाच्या शुभारंभानिमित्त ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर, तितक्याच वजनाची चांदी भेट व सोन्याच्या दागिन्यांची मजूरी २११ रुपये प्रति ग्रॅमपासून पुढे अशा खास सवलत योजना उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सहा जूनपर्यंत ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे. पारंपरिक दागिन्यांव्यतिरिक्त लाईटवेट ज्वेलरी, टर्कीश ज्वेलरी, टेम्पल ज्वेलरी, पूजेचे सामान, देवी देवतांच्या मूर्ती व असंख्य गिफ्ट आर्टिकल्स  येथे उपलब्ध असणार आहे;तसेच एक  ग्रॅम सोन्याचे दागिने व भेट वस्तूंचेदेखील येथे स्वतंत्र दालन आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZNDCA
Similar Posts
‘रांका ज्वेलर्स’चे अकरावे दालन पिंपळे सौदागरमध्ये पुणे : गेल्या १४० वर्षाची परंपरा असलेल्या ‘रांका ज्वेलर्स’चे अकरावे दालन आता पिंपळे सौदागर येथे सुरू होत आहे. कोकणे चौक येथील ‘भूमी अलीयम’ या इमारतीत असलेल्या या भव्य दालनाचे उद्घाटन रविवारी, ३१ मार्च २०१९ रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे.
पीएनजी ज्वेलर्सचे औंधमध्ये पहिले फ्रँचायजी स्टोअर पुणे : भारतातील सर्वांत विश्वसनीय ज्वेलरी ब्रँड असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने फ्रँचायजी क्षेत्रामध्ये प्रवेश केला असून, त्यांनी आपले पहिले फ्रँचायजी स्टोअर औंध येथे सुरू केले आहे. याचे उद्घाटन दसऱ्याच्या मुहूर्तावर अभिनेत्री रवीना टंडन हिच्या हस्ते करण्यात आले.
पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे विशेष सवलत योजना पुणे : लग्नसराई लक्षात घेऊन पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.ने विशेष सवलत योजना जाहीर केली असून, ग्राहकांचा तिला उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता योजनेचे शेवटचे काही दिवस राहिले असून, येत्या २ जूनपर्यंतच ही योजना सुरू राहणार आहे.
रांका ज्वेलर्सचे ११ वे दालन पिंपळे सौदागर येथे सुरू पुणे : १४० वर्षाची परंपरा असलेल्या रांका ज्वेलर्स परिवाराच्या पिंपळे सौदागरमधील कोकणे चौक येथे असलेल्या ११ व्या सुवर्ण दालनाचे नुकतेच शानदार उद्घाटन झाले. मार्च महिना हा स्त्री शक्तीचा गौरव करण्यासाठी सुपरिचीत आहे. याचेच औचित्य साधून या सुवर्णदालनाचे उद्घाटन रांका परिवारातील आजी पासून नातीपर्यंतच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language